Powered By Blogger

Thursday, 14 January 2016

पानिपताचे चटके..

हाॅस्टेल वर असताना एकदा घरुन 'पानिपत' (लेखक- श्री. विश्वास पाटील) वाचायला आणलं होतं. प्रामाणिक हेतु हा की 'नेमकं काय झालं होतं ज्यामुळे मराठा साम्राज्य हरलं?' हे जाणुन घ्यायचं होतं.

वाचन सुरु करायला काही मुहुर्त लागेचना. मग समोरच्या रुम मधला रामेश्वर आला होता तेव्हा त्याची नजर पुस्तकावर पडली म्हणला "भाऊ मला वाचायचंय मला दे."

आता ह्याला दिलं तर 10-12 दिवस वाचायला जमणार नाही. पण ह्याच्या उत्सुकतेला काय उत्तर देऊ?

मी म्हणालो, "अरे मी वाचतोऽय. माझं झालं की देइन पक्का."
पण साहेबांच्या आतला इतिहासप्रेमी जागा झाला होता एव्हाना. मग कसला गप्प बसतोय? हट्टाला पेटला. 

मग सुरु झाला आमचा करार, " मी जेव्हा वाचत नसेन तेव्हा तुला देइन, तसंच तू पण करायचं" Done.👍

चढाओढ सुरु, कोण पुढे जातो, जास्त वाचतो.

आमच्यातला एक आंघोळीला जरी गेला तरी पुस्तकाची देवाण-घेवाण होऊ लागली. तीन दिवसांत आम्ही 14 जानेवारी पर्यंत येऊन ठेपलो.

एकदा असंच पुस्तक देताना राम डोळे पुसत म्हणाला, "भाऊ, इथुन पुढचं हळु वाचु."

तिथुन मग वाचण्यासाठी पुस्तक एकमेकांना मागणं जड झालं. तरी पण पानिपत पुर्ण वाचुन काढलं.
आज नेमकं पानिपताच्या पोस्ट्स वाचुन ह्या किस्स्याची आठवण आली.


शुर योद्ध्यांना मनापासुन मुजरा!_/\_

हर हर महादेव !

No comments:

Post a Comment