आपला बाप्पा प्रत्येकाच्या भावविश्वात अगदी पहिल्या क्रमांकाचा देवबाप्पा आहे.
एकीकडे बापाचा शर्ट ओढत आवडत्या मुर्तीकडे खुणावणा~या निरागस पोरीचा 'लाडका' बाप्पा,
तिथेच बारकाईने मुर्तीच्या नयनचक्षुंमध्ये चैतन्य शोधणा~या बापाचा 'विघ्नहर्ता' बाप्पा.
एकीकडे बारा-तेरा वर्षांच्या सात-आठ लेकरांच्या 'मंडळा'चा मिरवत आणलेला 'गणेशा' तर एकीकडे गर्दीत,
मेट्याडोर ने आपल्या गावी नेत असलेल्या कुणा बापड्याचा ट्रॅवलकर बाप्पा.
एकीकडे कामाला हक्काची दांडी मारुन आपल्या यारदोस्तांकडे गावी जाणा~याचा 'यार' बाप्पा,
तर एकीकडे आॅफीसमध्ये मनापासुन सजावट करणा~याचा 'सोबती' बाप्पा.
असा हा बाप्पा एव्हाना ह्या सगळ्यांच्या आणि तुमच्या आमच्या घरी आरुढ झालाही असेल,
जल्लोश सुरु असेल. दहा दिस गोतावळा भरेल, 'मैफील'(गप्पांचीच) रंगेल, एकुण काय तर "मज्जा".
करा मग येंजाॅय!!
-----अभिज्ञ
No comments:
Post a Comment