Powered By Blogger

Tuesday, 26 January 2016

एकदिवसीय देशप्रेम...

खूप लोक लिहितील ह्यावर.
खूप लोक शिव्या पण देतील ह्या प्रकाराला.
पण बदल कुठे घडून येतोय का?
आजही कागदी आणि प्लास्टिक चे झेंडे, रिबीन्स, ब्याजेस, बिल्ले भरभरून विकले जातात.



आजही भरधाव गाड्यांच्या ह्यांडल ला अडकवला जातो माझा तिरंगा.


का?
देशप्रेम इतकं स्वस्त, सहज, आणि किफायती झालय?

मी आजच्या दिवशी अशी खूप बडबड करत असतो.

मग, आज मी झेंडावंदन आणि परेड बघायला पोलीस कवायत ग्राउंड वर गेलो होतो.
तिथे मला दिसले पोट सुटलेले पण तरीही जीवानिशी परेड मध्ये काही कमी पडू नये म्हणून झटणारे पोलीस.



तिथेच मला दिसले लहान पावलांनी आपापल्या जोरानुसार परेड करणारे सैनिकी शाळेचे विद्यार्थी.



आणि तिथेच मला दिसले माझ्याच वयाचे, पोलीस ट्रेनिंग सेंटर च्या भावी पोलिसांचे दिमाखदार संचालन.



तिथेच मला दिसला हा बापड्या ज्याला तिरंग्याचा पापा घेण्याचा मोह आवरत नव्हता.



मी दर झेंडावंदन ला इथे येणारे. सकारात्मक बदल घडवण्याची जादू आहे इथे. मी ह्या वातावरणाने भार्लोय पूर्णपणे तुम्ही ही अनुभव घ्या..

जय हिंद!

टीप : तिरंगा आहे तिथेच आहे. तो पडल्याने त्याचा अपमान होणार नाहीये, पण पायदळी येऊ देऊ नका 

Thursday, 14 January 2016

पानिपताचे चटके..

हाॅस्टेल वर असताना एकदा घरुन 'पानिपत' (लेखक- श्री. विश्वास पाटील) वाचायला आणलं होतं. प्रामाणिक हेतु हा की 'नेमकं काय झालं होतं ज्यामुळे मराठा साम्राज्य हरलं?' हे जाणुन घ्यायचं होतं.

वाचन सुरु करायला काही मुहुर्त लागेचना. मग समोरच्या रुम मधला रामेश्वर आला होता तेव्हा त्याची नजर पुस्तकावर पडली म्हणला "भाऊ मला वाचायचंय मला दे."

आता ह्याला दिलं तर 10-12 दिवस वाचायला जमणार नाही. पण ह्याच्या उत्सुकतेला काय उत्तर देऊ?

मी म्हणालो, "अरे मी वाचतोऽय. माझं झालं की देइन पक्का."
पण साहेबांच्या आतला इतिहासप्रेमी जागा झाला होता एव्हाना. मग कसला गप्प बसतोय? हट्टाला पेटला. 

मग सुरु झाला आमचा करार, " मी जेव्हा वाचत नसेन तेव्हा तुला देइन, तसंच तू पण करायचं" Done.👍

चढाओढ सुरु, कोण पुढे जातो, जास्त वाचतो.

आमच्यातला एक आंघोळीला जरी गेला तरी पुस्तकाची देवाण-घेवाण होऊ लागली. तीन दिवसांत आम्ही 14 जानेवारी पर्यंत येऊन ठेपलो.

एकदा असंच पुस्तक देताना राम डोळे पुसत म्हणाला, "भाऊ, इथुन पुढचं हळु वाचु."

तिथुन मग वाचण्यासाठी पुस्तक एकमेकांना मागणं जड झालं. तरी पण पानिपत पुर्ण वाचुन काढलं.
आज नेमकं पानिपताच्या पोस्ट्स वाचुन ह्या किस्स्याची आठवण आली.


शुर योद्ध्यांना मनापासुन मुजरा!_/\_

हर हर महादेव !