Powered By Blogger

Tuesday, 9 December 2014

गम्मत कराटेची

आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी विनोद घडतांना दिसून येतात. अगदी अलीकडचीच गोष्ट सांगतो. मी आमच्या मामाच्या गावी गेलो होतो. तिथे आमच्या मामाच्या चिमुकल्यांना त्यांचे 'टीचर' करटे शिकवत होते. मी असाच फेर-फटका मारायला म्हणून त्यांना बघायला गेलो.

आता आम्ही राहिलो गावाकडचे आमच्या मामाचा गाव मुंबई तिथे सब कूच polished. त्या कराटे च्या पोरांना पायात थोडासा वाकून हातवारे करतांना अनेक प्रश्न पडत होते. काहीतरी हास्यास्पद 'च्यो' की काय ओरडत पण होते. तो बारीक आवाज ते इवले इवले हात बघून कौतुक वाटावं की हसावं? पण आपले भाईलोग (मामाचे) होतेना.

झाला क्लास. आता वेळ होती आमच्या शंका-निरसनाची.

मी ; काय रे? ते काय ओरडत होतास तिकड?

भाऊ ; अरे दादा ते आम्हाला सरांनी सांगितलेलं. 'च्यो' म्हणतो आम्ही.

मी ; पण कशाला? 

भाऊ ; ओरडतांना जी ताकद मिळते ती फाईट मध्ये यायला.

मी ; ह्या!!

भाऊ ; ....(अडाणी)