Powered By Blogger

Monday 29 June 2015

अंबोलीची अनपेक्षित ट्रीप..


(वेळ अशीच एक सायंकाळ)
मामा, माझ्याशी गप्पा मारत होता. विषय अभ्यासाचा चाललेला असताना कसे कुणास ठाऊक आमचे मामाश्री 'सह्याद्री MTDC' चे अधिकारी असल्यगत म्हणाले," अरे, आभ्या सह्याद्री फिर पावसात. 'खरी' मजा आहे तिथे."
ही गोष्ट माझ्या डोक्यात तेव्हाच मुरली.

परवा सहकर्मचार्यांबरोबर अंबोली प्लॅन ठरला. राष्ट्रीय महामार्ग सोडुन आम्ही कच्च्या रस्त्याने जायच ठरवलं.

हिरवे गार गालिचे पांघरुन आम्हाला वाट देणारे सह्याद्रीचे घाट, त्यांमधुन वाहणारा वारा, मधेच हजेरी लावणारा पाऊस जणु,"माझं लक्ष्य आहे बरं का!" असंच सांगत होता. आणि त्यात आमचो कोकणचो माणुस, तो पत्ता पण त्याच्या कोंकणी इष्टाइलनं सांगायचा.

अंबोली धबधबा ऐन भरात होता, मनसोक्त भिजलो. नजर इतकी आसुसली होती कारण सगळं साठवायचं होतं.
ती वृक्षवल्ली, ते धुकं, ते तुषार, ती गर्दी
:-D अहाहाहाहाऽऽ!



खरंच, आपण खुप श्रीमंत (मापक : निसर्ग) असल्याची जाणिव झाली. आणि मामाश्रींसोबतचे संभाषण आठवले. तडक काॅल करुन अनुभवकथन केल्यावर जऽरा मोकळं वाटलं. डोक्यात स्कॅन झालं आणि एका गाण्याचे दोनंच शब्द आठवले,"...सह्याद्रीऽचे कडेऽऽऽ.."

अभिज्ञ